Nashik Graduate Election : उच्चशिक्षित मतदाराला मतदानापासून रोखले! पदवीधर निवडणूकीतील प्रकार

Voting
Votingesakal

नाशिक : नाशिक विभाग पदवीधर निवडणूक सोमवारी (ता. ३०) पार पडली. जिल्ह्यातून ४५ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मात्र मतदान प्रक्रियेच्या धामधूमीत पिंपळगाव बसवंत येथे नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी एका उच्चशिक्षित दृष्टिहीन प्राध्यापक महिलेला मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. (Highly educated voter prevented from voting at Nashik Graduate Election nashik news)

पदवीधर निवडणुकीसाठी पिंपळगाव बसवंत येथील मतदान केंद्रावर येथील महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका व पदवीधर मतदार सम्राज्ञी रहाणे या मतदानासाठी आल्या. त्यांचे मतदार यादीमध्ये नावही होते.

ओळखपत्र घेऊन त्यांनी मतदान कक्षात प्रवेश केला. दृष्टिहीन असल्यामुळे त्यांचे वडील डॉ. सुनील रहाणे यांनी आपल्या कन्येच्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी समर्थता दर्शवली. मात्र मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी त्यांना यावेळी मतदान करण्यास रोखले. त्यांना स्वतः मतदान करण्यास सांगितले गेले.

मात्र आपल्याला इतर निवडणुकीत वडील किंवा सोबतच्या अन्य व्यक्तीमार्फत मतदान करतो व करू दिले जाते, असे प्रा. सम्राज्ञी यांनी मतदान अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, तरीही मतदान करण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

Voting
Market Committee Election : बाजार समित्यांच्या निवडणुकांनाही आता ‘आचारसंहितेचा’ फास!

याबाबत निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांच्याशी संपर्क साधला असता पदवीधर मतदारसंघामध्ये स्वतःच मतदान करायचे असते, असा नियम असल्याचे सांगितले. मतदानासाठीचे सर्वच नियम मतदार नागरिकांना माहीत नसतात.

प्रशासनाने याबाबत निवडणूक कार्यक्रम लागल्यापासून अशा मतदारांना नियम सांगणे अपेक्षित असते. मात्र, तसे न केल्यामुळे राज्यशास्त्राच्या प्राध्यापिकेलाच मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली.

''अंध व्यक्तीला सहाय्यक म्हणून मतदान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे घोषणापत्र तीन दिवस आधी द्यावे लागते, ही माहिती आम्हाला नव्हती. प्रशासनानेही तसे आम्हाला कळवले नव्हते. आजपर्यंत सर्वच निवडणुकांत सहाय्यक म्हणून मतदान करताना कधीही रोखले गेले नाही. प्रथमच मुलीला नियमावर बोट ठेवून मतदानापासून वंचित ठेवण्यात आले याची खंत वाटते.''

- डॉ. सुनील रहाणे, मतदार महिलेचे वडील

Voting
Nashik News : इगतपुरी नगर परिषदेत अग्निशमन दलाची पदे रिक्त! 10 वर्षांपासून भरती नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com