महार्गावर अपघात वाढताय, कंत्राटदाराचे मनमानी कारभार सुरूच

महार्गावर अपघात वाढताय, कंत्राटदाराचे मनमानी कारभार सुरूच
Published on: 
टुडे १, मेन ---- महामार्ग मजबुतीकरणाच्या संथ कामावरून वाद उपशीर्षक नगरसेवकाचे पालकमंत्र्यांना साकडे; कंत्राटदाराच्या मनमानीबद्दल तक्रार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २९ : शहरातील मुख्य महामार्गासह समांतर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने आणि नियोजनाअभावी सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांत १४ हून अधिक नागरिकांना अपघातांत जीव गमवावा लागल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवक अमर जैन यांनी कंत्राटदाराच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. आणखी किती नागरिकांचे बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार, असा सवाल करीत त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार स्मिता वाघ यांच्याकडे महामार्गाचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. महापालिकेच्या मेहरूण परिसरातील जुन्या टीबी सेंटरच्या जागेवर उभारण्यात आलेल्या कचरा ट्रान्सफर स्टेशनच्या लोकार्पण सोहळ्यानंतर गुरुवारी (ता. २९) हा विषय उपस्थित झाला. कार्यक्रम संपल्यानंतर पालकमंत्री पाटील, खासदार वाघ आणि आमदार सुरेश (राजूमामा) भोळे जात असताना जैन यांनी त्यांची भेट घेऊन महामार्गाच्या कामातील अडचणींकडे लक्ष वेधले. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधितांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. अपूर्ण कामांमुळे धोका महामार्गाच्या कंत्राटदाराने समांतर रस्त्यांचे काम काही ठिकाणी केले असून, अनेक ठिकाणी ते अपूर्ण सोडले आहे. मुख्य महामार्गावर गटारींचे काम सुरू असताना काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने अपघातांचा धोका वाढत असल्याचे जैन यांनी निदर्शनास आणले. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असताना प्रशासन आणखी किती काळ प्रतीक्षा करणार, असा संतप्त सवालही त्यांनी केला. ----------- चौकट कामाच्या गुणवत्तेवर खासदारांची नाराजी खासदार स्मिता वाघ यांनीही महामार्गाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. शहरातील महामार्ग, बायपास तसेच पाळधी ते धुळे दरम्यानच्या महामार्गाच्या कामांचा उल्लेख करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराकडून दर्जेदार आणि नियोजनबद्ध काम करून घेण्याची गरज अधोरेखित केली. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असून, नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.