ज्या काळात समाजातील शिक्षणाची दारे ठराविक घटकांसाठी खुली होती, त्या काळात समाजातील धुरिणांनी बहुजनांच्या हितासाठी शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा विचार केला. त्यातून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची स्थापना झाली. आज शतकोत्तर वाटचाल करताना संस्थेने पारंपरिक, व्यावसायिक, वैद्यकीय शिक्षणक्रम उपलब्ध करून दिले आहेत.