Sunil Munje
sakal
नाशिक: पंचवटीच्या हिरावाडीतील नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबा मांत्रिकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुनील बबन मुंजे असे अटक केलेल्या मांत्रिकाचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी सोमवारी (ता. १) मध्यरात्री सदरील कारवाई केली असून, न्यायालयाने त्यास एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मांत्रिकाच्या अटकेने अंनिसने केलेल्या दाव्याला पुष्टी मिळाली आहे. दरम्यान, याप्रकरणातील मृत विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी अटकेतील संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत बुधवारी (ता.३) संपत आहे.