नाशिकचाही वेदपरंपरेत उल्लेख; २७ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर उपक्रम

नाशिकचाही वेदपरंपरेत उल्लेख; २७ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर उपक्रम
Published on: 
फोटो : ३३४११, १२ त्र्यंबकेश्‍वरच्या बालसाधकांचे काशीमध्ये दंडक्रम पारायण --- नाशिकचाही वेदपरंपरेत उल्लेख; २७ ऑक्टोबर ते १५ डिसेंबरदरम्यान उपक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : धार्मिक आणि वेदपरंपरेच्या पार्श्वभूमीवर काशी येथे त्र्यंबकेश्‍वर येथील बालसाधक अद्वैत काकडे (वय १८), समर्थ काकडे (१३) यांचे कंठस्थ दंडक्रम पारायण होत आहे. पुणे येथील महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानतर्फे २७ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत काशीतील कांची शंकराचार्य मठ, हनुमान घाट येथे हे पारायण होईल. या पारायणात वेदपठणातील अचूकता, स्वरशुद्धता, स्मरणशक्ती आणि सातत्यपूर्ण साधनेची कसोटी लागते. पारायणाच्या केंद्रस्थानी वेदघनपाठी अद्वैत काकडे आणि समर्थ काकडे हे दोन बालसाधक आहेत. त्यांनी कठोर सराव आणि नियमित अध्ययनातून वेदपठणातील प्रावीण्य मिळविले. हा उपक्रम ‘विश्वविक्रमी ऐतिहासिक’ होणार आहे. कारण, यापूर्वी या वयात दंडक्रम पारायण झालेले नाही. वेदाध्ययनाच्या क्षेत्रातील ही महत्त्वपूर्ण कामगिरी असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. दंडक्रम पारायण दररोज सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत होणार आहे. हा उपक्रम २७ ऑक्टोबरपासून सुरू होईल. तो १५ डिसेंबरपर्यंत असेल. कंठस्थ दंडक्रम पारायणासाठी आवश्यक असलेले पाठांतर, मंत्रोच्चारातील अचूकता आणि दीर्घकालीन सराव यामुळे यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पारायणासाठी वेदभास्कर प्रशांत जोशी गुरुजी व वे. मू. श्री घनपाठी किरणशास्त्री पाठक परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्यासह अन्य विद्वानांचे आशीर्वाद या उपक्रमाला लाभले आहेत. त्र्यंबकेश्‍वर येथील समर्थाद्वैत वेदपाठशाळेचे संस्थापक शैलेंद्र प्रभाकर काकडे गुरुजी हे अद्वैत व समर्थ यांचे वडील असून, त्यांनी कैलास मठ तसेच गंगा गोदावरी मंदिर वेदपाठशाळा (त्र्यंबकेश्‍वर) येथे अध्यापन केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही धार्मिक परंपरा, तीर्थक्षेत्रे आणि साधना यासाठी परिचित स्थळे आहेत. चेन्नई, नाशिक, सुरत आणि वडोदरा यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घनपारायणांचे आयोजन झाले. त्यामुळे वेदाध्ययनाची परंपरा विविध भागांत जतन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना या उपक्रमानिमित्त उजाळा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com