जुने नाशिक- रविवार कारंजा भागातील तीन पिढ्यांचे ऋणानुबंध जपत असलेली यशवंत मंडई अखेर जमीनदोस्त झाली. वर्षानुवर्षे मंडईत व्यवसाय करणाऱ्या आणि परिसरातील अन्य व्यावसायिकांचे मन मात्र यामुळे काहीसे हळवे झाले होते. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. या भावनेतून झालेला बदल आत्मसात करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.