Historical Temple : धरणसाठ्यात 11 महिने राहणारे बाराव्या शतकातील शिवमंदिर! मध्ययुगीन सती शिळा

The Shiva temple which resides in the Vaitrana dam reservoir for eleven months of the year and comes into view as the dam reservoir recedes.
The Shiva temple which resides in the Vaitrana dam reservoir for eleven months of the year and comes into view as the dam reservoir recedes.esakal

Historical Temple : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाच्या (ता. इगतपुरी) पाण्यात इतिहास दडलाय. इतिहासाच्या पाऊलखुणा मेमध्ये दिसतात. अकरा महिने धरणसाठ्यात राहणारे बाराव्या शतकातील शिवमंदिर आहे.

मंदिराकडे वांजोळे गावातून जाता येते. धरणसाठ्याची पातळी कमी झाली की, मंदिर दिसू लागते. अकरा खांबाचा सभामंडप दृष्टीक्षेपात येतो. मंदिराच्या परिसरात सती शिळा आहे. (Historical Temple 12th century Shiva temple that lived in dam for 11 months Stale medieval sati idol nashik news)

मंदिराच्या परिसरात मंदिराचे दगड, पिंड, शिल्प आढळतात. मंदिराच्या रचनेवरून हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. हे मंदिर नाशिक जिल्ह्याचा अनमोल ठेवा मानला जातो. साधारणतः आठशे वर्षे यादव कालखंडातील हे मंदिर आहे.

गोविंदराव यादव यांनी सिन्नरचे चंद्रेश्वर मंदिर, रतनगड येथील शिव मंदिर बांधले होते. त्यावेळी त्यांनी हे मंदिर बांधले असावे अशी शक्यता इतिहास अभ्यासक वर्तवतात. ग्रामस्थांच्या मौखिक परंपरेतून पुढे आलेल्या माहितीनुसार चक्रधर स्वामी भ्रमण करत असताना ते या मंदिरात थांबत असत.

वांजोळे गावात अशी दोन मंदिरे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. एक मंदिर धरणात तर दुसरे मंदिर एका शेतात होते. या मंदिराचा कळस दिसतो. मंदिर पूर्ण जमिनीमध्ये गेले असून कळसावर गणपती व इतर मूर्ती दिसतात.

गावातील मंदिर पाहिलेल्या ज्येष्ठांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर त्र्यंबकेश्वरच्या मंदिरासारखे दिसत होते. पूर्वी नाशिक ते मुंबई असा सध्याचा महामार्ग नव्हता. घोटी -झारवड -त्र्यंबकेश्‍वर हा मार्ग होता.

झारवडला त्याकाळी बाजारपेठ होती. हा परिसर तत्कालीन नगर जिल्ह्यात होता. कावनाई तालुका होता, अशी माहिती पुढे आली. वैतरणा धरणाचे काम १९६५ मध्ये सुरू झाले आणि १९७२ मध्ये पूर्ण झाले.

१९७२ पासून हे शिवमंदिर पाण्यात गेले. धरणातील गावांचे स्थलांतर झाले, पण मंदिराला गांभीर्याने न घेतल्याने धरणसाठ्यात ते जात राहिले. वांजोळे गावातील नागरिक मंदिरात धन असल्याची आख्यायिका सांगतात.

गावातील गोविंद महाले यांचा चार चौकांचा वाडा पंचक्रोशीत परिचित आहे. या वाड्याचे अवशेष पाहावयास मिळतात. धन शोधण्यासाठी इथे गर्दी झाल्याचे ज्येष्ठांनी पाहिले. मात्र धन सापडल्याने खोदकाम केले गेले. आता ग्रामस्थ प्रतिबंध करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The Shiva temple which resides in the Vaitrana dam reservoir for eleven months of the year and comes into view as the dam reservoir recedes.
Historical Inscription: लाखलगावाच्या घाटावर अठराव्या शतकातील ‘शिलालेख'! सरदार अप्पाजी वैद्य यांचा इतिहास

वांजोळे गावाजवळील मंदिर परिसरात पश्चिमेला आठवे डोंगर, उत्तरेला ब्रह्मगिरी आणि अंजनेरी, दक्षिणेला कावनई किल्ला आहे. इथून हरिहर किल्ला दिसतो. पूर्वी शेवगीडांग व वांजोळे या गावांच्या शिवेवर मंदिर होते.

सरकारने मंदिर संवर्धनासाठी पूर्वी निधी मंजूर केला. गावच्या वादात मंदिराचे संवर्धन झाले नसल्याची माहिती गावाचे पोलिस पाटील नथू कुटके यांनी दिली. इंग्रज राजवटमध्ये मुलखी पाटील होते. त्यावेळी नामदेव कुटके हे पाटील होते. ते पंधरा ते वीस गावांचे प्रमुख होते.

शिल्पकलेचा उत्तम नमुना

वैतरणा धरण भागातील मंदिर परिसरातील सती शिळा शिल्पकलेचा उत्तम नमुना व घडलेल्या सती प्रसंगाचे चित्रण त्यावरती कोरलेले आहे. सती शिळेला पाच कप्पे आहेत.

सती शिळेच्या शिरोभागी मंगल कलश मोक्ष प्राप्तीचे संकेत आहे. कलशाशेजारी सूर्य, चंद्र चिन्ह कोरली आहेत. सूर्य, चंद्र असेपर्यत सतीची ख्याती राहील असा त्याचा अर्थ असावा असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

"धरणसाठ्यात अकरा महिने राहणारे बाराव्या शतकातील शिवमंदिर आहे. असेच एक मंदिर एका शेतामध्ये गाडले गेले. या मंदिराचे संवर्धन व्हावे, यासाठी प्रयत्न व्हावेत. मंदिर संवर्धनातून पर्यटन वाढेल आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल."- नथू कुटके, पोलिस पाटील, वांजोळे

"पतीच्या मृत्यूनंतर सहगमन करण्याची प्रथा देशात होता. तसेच लढाई हा जीवनाचा स्थायी भाव होता. मग राज्याच्या हिताच्या कोणत्याही कारणासाठीचा असो. राज्यकर्त्यांच्या लष्करी सेवेत पुरुष असत. रणांगणावर वीरमरण आले, की स्त्री सती जायची. त्याची आठवण म्हणून सती शिळा केल्या जात असत. मंदिरासोबत ऐतिहासिक संदर्भांचे संवर्धन अपेक्षित आहे."
- अनिल दुधाने, विरगळ अभ्यासक, पुणे

The Shiva temple which resides in the Vaitrana dam reservoir for eleven months of the year and comes into view as the dam reservoir recedes.
Buffed Historical Figures : गांधी, न्यूटन ते लिंकन! जिम लावल्यानंतर अशा दिसतील या महान व्यक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com