नाशिक : लॉकडाउनमुळे संचारबंदी लागू असल्याने ठराविक कार्यक्रम वगळता एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येत नाही. हाच नियम महासभेलादेखील लागू असल्याने यापूर्वी कोरोना लागणची जबाबदारी घेण्यावरून रद्द केलेली महासभा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी परवानगी दिल्यानंतर मंगळवारी (ता.26) नोटीस जारी करण्यात आली. महापालिके च्या इतिहासात प्रथमच ऑनलाइन महासभा होत आहे.
शुक्रवारी व्हीसीद्वारे सभा
सलग तीन महिने महासभा न घेतल्यास कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे महासभा घेण्याची परवानगी मागण्यात आली होती. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी मांढरे यांनी महासभेकडे चेंडू टोलावला होता. महापौर सतीश कुलकर्णी यांनी सभेची तयारी केली. परंतु विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी त्यास विरोध करताना एखाद्याला कोरोना झाल्यास व त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री महासभेची निघाल्यास जबाबदारी घेणार का, असा सवाल उपस्थित केल्यानंतर सारेच बुचकाळ्यात पडले होते. त्यानंतर आयुक्तांकडे चेंडू टोलावण्याचा प्रयत्न झाला. आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत नकार देताना महासभेची जबाबदारी असल्याचे सूचित केले होते. त्यानंतर पुन्हा संभ्रमित अवस्था निर्माण झाल्याने महासभा रद्द करण्याचा निर्णय महापौर कुलकर्णी यांनी घेतला होता.
शंका-कुशंकांना फाटा देत आता ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आयुक्तांच्या दालनाशेजारील कॉन्फरन्स हॉलमधून आयुक्त, महापौर व उपमहापौर सभेचे नेतृत्व करतील. सदस्यांना त्यांचे प्रश्न व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मांडता येतील. विषयांची यादी प्रत्येकाला घरी पोचविली जाणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक प्रत्येकाला अँड्रॅइड मोबाईलवर पाठविली जाणार असल्याची माहिती नगरसचिव राजू कुटे यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.