लग्न होऊन चार महिनेही झाले नव्हते...अन् नैराश्यातून युवकाने उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 26 मे 2020

सुमित याचा नुकताच चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. सुमित हा आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात योगदान देत होता. लॉक डाऊन दरम्यान मुंबई नाशिक मार्गाने जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना मसाला भाताचे कंटेनर वाटण्याचे काम केले होते. पण अचानक त्याच्या आयुष्यात असे काय घडले की त्याने थेट टोकाचे पाऊल उचलले. याबाबत शहरवासीयही संभ्रमात आहेत.

नाशिक / घोटी : युवकाचा याचा नुकताच चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. सुमित हा आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात योगदान देत होता. लॉक डाऊन दरम्यान मुंबई नाशिक मार्गाने जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना मसाला भाताचे कंटेनर ( बाउल ) वाटण्याचे काम केले होते. पण अचानक त्याच्या आयुष्यात असे काय घडले की मंगळवार ( ता. 26) सकाळी अकरा वाजता त्याने थेट टोकाचे पाऊल उचलले. याबाबत शहरवासीयही संभ्रमात आहेत.

अशी घडली घटना

वासुदेव चौकातील सुमित रमणलाल मोदी ( वय 33 ) या युवकाने आपल्या राहत्या घरात नैराशातून पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुमित याचा नुकताच चार महिन्यापूर्वी विवाह झाला होता. सुमित हा आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात योगदान देत होता. लॉक डाऊन दरम्यान मुंबई नाशिक मार्गाने जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांना मसाला भाताचे कंटेनर ( बाउल ) वाटण्याचे काम केले होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी हळहळ व्यक्त करत सामुदायिक दुखवटा पाळण्यात आला. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धर्मराज पारधी हे करत आहे. 

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात

शहरातील वासुदेव चौक येथील युवकाने आपल्या राहत्या घरातील पंख्याला मंगळवार ( ता. 26) सकाळी अकरा वाजता गळफास घेत आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी घटनास्थळी धाव घेत मृत्यूदेह नागरिकांच्या मदतीने खाली उतरावत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! घरी लग्नाची धामधूम...अन् हळदीच्याच दिवशी प्रेमीयुगुलाला अग्निडाग..पित्यावर दुर्दैवी प्रसंग..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: commits suicide due to depression at ghoti nashik marathi news