होम आयसोलेशन रुग्ण ठरताहेत कोरोना स्प्रेडर्स! वैद्यकीय पथकाच्या पाहणीतील निष्कर्ष 

 home isolation patients are becoming Corona spreaders Nashik Corona Updates
home isolation patients are becoming Corona spreaders Nashik Corona Updates

नाशिक : कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत सहा ते आठपटीने वाढ होत आहे. युरोपियन स्टेन्स असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा असला तरी प्रत्यक्षात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना अमलात न आणल्याने अधिक वाढ होत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय पथकाने काढला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स राखणे व सॅनिटायझेशन करणे हाच एकमेव उपाय कोरोना संसर्ग रोखण्यासाठी असल्याचा ठाम दावा केला आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांकडून सर्वाधिक कोरोना संसर्ग होत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. 

वर्षभरात एक हजार २७७ मृत्यू

गेल्या वर्षाच्या तुलनेत फेब्रुवारीपासून कोरोना संसर्गाचा वेग अधिक वाढला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर हे दोन महिने कोरोनाचे सुपर स्प्रडेर्स ठरले होते. मार्चमध्ये त्याहून अधिक रुग्ण आढळले. एप्रिलमध्ये दीड ते अडीच हजारांच्या दरम्यान कोरोना रुग्ण शहरात आढळून येत आहेत. ७ एप्रिलपर्यंत शहरात एक लाख ३२ हजार १६१ रुग्ण आढळून आले. त्यापैकी एक लाख, ११ हजार २१२ रुग्णांना घरी सोडले, तर १९ हजार ७३५ रुग्ण उपचार घेत आहेत. वर्षभरात एक हजार २७७ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत कोरोना संसर्ग अधिक वेगाने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय पथकाने कोरोना संसर्ग वाढण्याच्या कारणांचा शोध घेतला. त्यात विविध मुद्दे आढळून आले. त्यात सर्वाधिक महत्त्वाचे कारण होम आयसोलेशनमधील कोरोनाबाधितांचा घराबाहेर होणारा वावर हे महत्त्वाचे कारण ठरत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 


संसर्ग वाढण्याची महत्त्वाची कारणे 

- होम आयसोलेशनमधील काही नागरिक बाहेर फिरत असल्याने कोरोना संसर्गाचा फैलाव होत आहे. 
- सर्दी, खोकल्याची लागण झाल्यानंतर एचआरसीटी करण्यास गर्दी होत असल्याने ते भागदेखील सुपर स्प्रेडर्स ठरत आहे. 
- ताप, सर्दी, खोकल्यासाठी तात्पुरत्या औषधांवर इलाज केला जात आहे. 
- किरकोळ आजारासाठी डॉक्टराकडे न जाता अंगावर काढणे. 
- आजार अंगावर काढताना इतरांनादेखील संसर्ग होत आहे. 
- झोपडपट्टी, बाजारपेठांमधील शौचालये कोरोना स्पेडर्सची ठिकाणे. 
- झोपडपट्टी भागात मास्क परिधान न करता नागरिकांचा वावर. 
- तोंडावर लावलेला मास्क वांरवार खाली-वर करणे. 
- सार्वजनिक ठिकाणच्या वस्तूंना वारंवार हात लावणे. 
- सार्वजनिक ठिकाणी अधिक काळ वावर असणे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com