Homing Instinct: अबब! मांजरीने 4 दिवस प्रवास करत गाठले घर; घरी राहिल्यावर पिल्ल्यांसाठी पुन्हा परतीचा प्रवास!

Sangeeta Rathi with her cat 'Iti' who came home after a four-day journey from the farm house.
Sangeeta Rathi with her cat 'Iti' who came home after a four-day journey from the farm house.esakal

नाशिक : मांजरीने चार दिवस १५ किलोमीटर प्रवास करत घर गाठले. घरी राहिल्यावर पुन्हा ती पिल्ल्यांसाठी तेवढाच प्रवास करत फार्म हाऊसमध्ये पोचली.

मांजरींमधील ‘होमिंग इन्स्टिंक्ट' विशेष क्षमतेची आणि तिने घर शोधण्यासाठीच्या पृथ्वीच्या भूचुंबकीय क्षेत्र-सुगंधी संकेताचा एकत्रितपणे वापर केल्याची प्रचिती तिच्या मालकांना आलीयं. (Homing Instinct cat traveled 4 days to reach home back to farm house home again for pups nashik news)

कॉलेज रोडवरील शिर्के मळ्यातील संगीता हेमंत राठी यांना लहानपणापासून मांजरांचा सांभाळ करण्याची आवड आहे. त्यांनी मांजर विकत आणल्या नाहीत. मांजरी स्वतः त्यांच्या घरात हक्काने आश्रयाला येतात. एका मांजरीची चौथी पिढी त्यांच्याकडे राहते. कोरोना काळात त्यांच्याकडे एक मांजर आली.

तिने त्यांच्या घरात तीन पिल्लांना जन्म दिला. त्यातील दोन पिल्ले संगीताताईंकडे राहिली. पिलांची आई घर सोडून निघून गेली. दोन पिलांना सांभाळण्याचे काम ताई करत होत्या. ताईंनी एका पिलाचे नावे ‘सु’ आणि दुसरीचे ‘इटी’ असे ठेवले. मोठ्या झालेल्या दोन्ही मांजरींना पिले झाली.

राठी कुटुंबाने ‘इटी’ ची पिलांसह त्यांच्या सावरगाव-गंगावरे येथील फार्म हाऊसमध्ये रवानगी केली. दोन्ही मांजरींची काळजी घेता यावी, हा उद्देश त्यामागील होता. प्रत्येक शनिवारी राठी कुटुंब तिला भेटायला जायचे. ‘इटी’ ला फार्म हाऊसमध्ये करमत नव्हते.

‘इटी’ ने पिल्ले दुसरीकडे नेवून ठेवली आणि ती निघाली घराकडे. ‘सुरभी’ बंगल्यात ती आली आणि बागेत बसली. संगीताताईं बाहेर आल्यावर त्यांना धक्का बसला. त्यांनी ‘इटी’ असा आवाज देताच ती धावत ताईंकडे आली.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Sangeeta Rathi with her cat 'Iti' who came home after a four-day journey from the farm house.
Nashik News: शिवसेनाप्रमुखांचे योगदान तरुण पिढीला प्रेरणादायी : खासदार गोडसे

त्यांनी फार्म हाऊसमध्ये चौकशी केल्यावर ‘इटी’ चार दिवसांपासून दिसत नसल्याची माहिती मिळाली. दोन दिवस या घरात राहून पिल्ले दुसरीकडे असल्याने ‘इटी’ ने पुन्हा चार दिवसांचा प्रवास करत ती पिल्ल्यांसह फार्म हाऊस गाठले. दरम्यान, एक बिबट्या ठाणे परिसरात सोडला असताना तो पुन्हा निफाडमध्ये आढळून आल्याची घटना यापूर्वी घडली होती.

पाळीव मांजर सुद्धा मोठा प्रवास करू शकते, हे या घटनेने समोर आले आहे. मांजरींना ‘होमिंग इन्स्टिंक्ट’ विशेष क्षमता घरी परतण्याचा मार्ग शोधण्यात मदत करते. तसेच दिशानिर्देशाची जाणीव त्यांच्यात असते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

३० टक्के मांजरी पूर्वीच्या घरी परतात

अभ्यासकांच्या अहवालांमध्ये असे म्हटले आहे की, ३० टक्क्यांपर्यंत मांजरी त्यांच्या पूर्वीच्या घरी परतण्याचा प्रयत्न करतात. हरवलेल्या पाळीव प्राण्यांच्या संशोधन प्रकल्पानुसार मांजरीने अडीच वर्षात ५० ते ८० मैल, ६ महिन्यांत ३८ मैल, १० दिवसात ३० मैल आणि २१ दिवसात २० मैल प्रवास केल्याचे दिसून आले.

"मुक्या प्राण्यांना जितके प्रेम द्याल, तितके ते तुमच्या जवळ राहतील. ‘इटी‘चे कोरोना काळात संगोपन केले. औषधोपचार केले. घरातील सदस्यासारखी वागणूक दिली. त्यामुळे हे घर आपले वाटत होते. तसेच मांजरींना दिशानिर्देश, चुंबकीय नकाशा लक्षात ठेवता येतात. त्यामुळे ते असा मोठा प्रवास करू शकतात. चार दिवस प्रवास करून ती घरी आली ही घटना खूप काही शिकवून जाते."- डॉ. संजय गायकवाड, उपायुक्त, पशुसंवर्धन, औरंगाबाद

Sangeeta Rathi with her cat 'Iti' who came home after a four-day journey from the farm house.
Nashik News : पती योग्यच निर्णय घेतील ना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com