Nashik News: शिवसेनाप्रमुखांचे योगदान तरुण पिढीला प्रेरणादायी : खासदार गोडसे | Hemant Godse News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hemant Godse Nashik News

Nashik News: शिवसेनाप्रमुखांचे योगदान तरुण पिढीला प्रेरणादायी : खासदार गोडसे

Nashik News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावेत व महाराष्ट्राची भरभराट व्हावी, यासाठी आयुष्य वेचले. त्यांनी समाजहितासाठी उभ्या केलेल्या चळवळीतील अनेक सुवर्णक्षण आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या या कार्याची महती तरुण पिढीपर्यंत पोचविण्यासाठी भरविण्यात आलेल्या ‘बायोग्राफी’ या चित्रप्रदर्शनास नाशिककरांनी अवश्‍य भेट द्यावी, असे आवाहन खासदार हेमंत गोडसे यांनी येथे केले.

(MP Godse Says Contribution of Shiv Sena chief Balasaheb Thackeray Inspiring young generation Nashik News)

हेही वाचा: SPORTS News : ‘खेलो इंडिया गेम’ मध्ये संस्कृती करणार राज्याचे प्रतिनिधित्व

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त (ता. २३ जानेवारी) गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहाशेजारच्या मैदानात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. रविवारी (ता. २२) मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. त्या वेळी खासदार गोडसे बोलत होते.

सुरवातीला प्रदर्शनस्थळी उभारण्यात आलेल्या बाळासाहेबांच्या भव्य प्रोट्रेटचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

हेही वाचा: Jalgaon News : ‘अलबत्या गलबत्या’ नाटक जळगावात

बाळासाहेबांची शिवसेनाचे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, अनिल ढिकले, भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख बंटी तिदमे, आर. डी. धोंगडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई ताठे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश म्हस्के, सदाभाऊ नवले, दिगंबर नाडे, नितीन साळवे, शिवाजी भोर, सचिन भोसले, वैशाली दाणी, सूर्यकांत लवटे, योगेश बेलदार, मामा ठाकरे आदी उपस्थित होते.

प्रदर्शनात स्केचने रेखाटलेले ८०० फूट लांब आणि पाच फूट उंचीचे विविध घटनांमधील चित्रे मांडण्यात आली आहेत. दरम्यान, उद्‌घाटनानंतर मान्यवरांनी प्रदर्शनातील बायोग्राफी बघण्याचा आंनद लुटला.

हेही वाचा: Jalgaon News : ‘अलबत्या गलबत्या’ नाटक जळगावात