Honey Trap : अश्‍लील फोटो प्रसारित करण्याची धमकी; संशयितांना अटक

Central Crime Branch team with suspects in the Hanni Trap case
Central Crime Branch team with suspects in the Hanni Trap caseesakal

जुने नाशिक : तरुणीबरोबर अश्‍लील फोटो आणि चित्रफित काढून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. यातील संशयितांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. सोनू ऊर्फ बालेश नरहरी देशमुख (वय ३५, रा. नैतळे, ता. निफाड, ह. मु. पांडवनगरी), अविनाश विजेंद्र परदेशी (द्वारका) असे संशयितांची नावे आहेत.

संशयित इम्रान इनामदार (रा. साईनाथनगर, इंदिरानगर) त्याच्या सहकारी पुरुष आणि महिलांसह वडाळा गावातील नासीर खान यांना चारचाकी विक्री करण्याचा बहाना करून त्र्यंबकेश्वरलगत असलेल्या निर्जनस्थळी घेऊन गेले. त्यास पिण्याच्या पाण्यामधून गुंगीचे औषध दिले. नासीर बेशुद्ध होताच त्याचे तरुणीसह अश्‍लील छायाचित्र आणि चित्रफित काढली. त्यांना प्रसारित करण्याची धमकी देत त्याच्याकडून सुमारे ९५ हजारांची रक्कम उकळली.

Central Crime Branch team with suspects in the Hanni Trap case
Child Labour : वेठबिगारी, बालमजुरीने बालपणाचा आवळला गळा; घटनांमध्ये वाढ

याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. २८) गुन्हा दाखल झाला. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे हवालदार शेरखान पठाण आणि पोलिस नाईक संदीप पवार यांना काही संशयितांची माहिती मिळाली. त्यांनी माहितीची खातर जमा केली. सोनू देशमुख व अविनाश परदेशी यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या पथकातील कर्मचारी शेरखान पठाण, श्रीराम सपकाळ, संजय गामने, बाळू बागूल, संदीप पवार, गणेश वाघ यांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. मुख्य संशयित इम्रान इनामदार याच्यासह महिला फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Central Crime Branch team with suspects in the Hanni Trap case
Shardiya Navratri 2022 : कालिकामातेच्या दर्शनास तोबा गर्दी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com