Child Labour : वेठबिगारी, बालमजुरीने बालपणाचा आवळला गळा; घटनांमध्ये वाढ

child labour News
child labour Newsesakal

नाशिक : इगतपुरीपाठोपाठ त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात वेठबिगारीची घटना उघडकीस आली, तर शहरी भागात हॉटेल, चहा टपरीसह अनेक ठिकाणी बालमजूर आढळून येत आहेत. प्रशासनाची ढिम्म कारवाई, समाजात हरवत चाललेली संवेदनशीलतेमुळे बालपणाचा गळा आवळला जात असल्‍याची चिंता व्‍यक्‍त होत आहे.

इगतपुरी तालुक्‍यातील उभाडी येथील बालकांकडून जिल्‍हाबाहेर वेठबिगारीची कामे करून घेणाऱ्यांवर सप्‍टेंबर महिन्‍यात कारवाई करण्यात आली होती. यानंतर प्रशासनाने अशा घटनांमध्ये कठोर भूमिका घेत कारवाईचा इशारा दिला होता. या घटनेला अवघे काही दिवस उलटलेले असताना, त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यात ११ वर्षीय बालिकेकडून वेठबिगारीची कामे करून घेतली जात असल्‍याचा धक्‍कादायक प्रकार निदर्शनात आला. (increasing cases of Child labour privation Nashik Latest Marathi News)

child labour News
Animal Sacrifice : पशुबळी टाळणे हाच संविधानाचा सन्मान; अंनिसचे आवाहन

दुसरीकडे शहरी भागांमध्येही बालमजूर सर्रासपणे आढळून येत आहेत. सध्या भरलेल्‍या नवरात्रोत्‍सवातील यात्रेपासून, तर शहरातील अनेक दुकानांमध्ये बालमजूर कामाला असल्‍याच्‍या धगधगत्‍या वास्‍तवाकडे प्रशासकीय यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष आहे.

कारवाईचा फार्स संपणार कधी

वेठबिगारीच्‍या घटनांबाबत कठोर कारवाई करण्याचा इशारा देऊनही अद्याप प्रकरणे उघडकीस येत असल्‍याने प्रशासकीय दाव्‍यांची पोलखोल होत आहे. सध्या धाडसत्र राबविले जात असले, तरी त्‍याचे प्रमाण अत्‍यंत तोकडे आहेत.

केवळ कागदोपत्री कारवाईचा फार्स दाखविण्यापेक्षा कठोर उपाययोजना होणे गरजेचे आहे. पोलिस, कामगार उपायुक्‍त कार्यालय, सामाजिक संस्‍था, स्‍थानिक प्रशासन, अशा विविध पातळ्यांवर संयुक्‍तीक प्रयत्‍नांतून बालकांना त्‍यांचे निरागस बालपण जगू देण्यासाठी प्रयत्‍न होण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होत आहे.

child labour News
Navratrotsav 2022 : सातवी माळ; सुटीमुळे 30 हजारांवर भाविक जगदंबाचरणी लीन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com