Nashik News: ‘ओतूर’प्रकल्पाच्या आशा पल्लवीत! आमदार नितीन पवारांचा पाठपुरावा

Otur Minor Irrigation Project
Otur Minor Irrigation Projectesakal

Nashik News : उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार पुन्हा विराजमान झाल्याने आणि त्यांना आमदार नितीन पवार यांनी खुले समर्थन दिल्याने तांत्रिक कारणास्तव बंद पडलेल्या तालुक्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या ओतूर लघु पाटबंधारेच काम पुन्हा सुरु होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

यासाठी आमदार पवार यांच्याकडून पाठपुरावा देखील करण्यात येत असून यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक देखील झाली आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ७० कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम झाल्यास कळवण तालुक्यातील सिंचनाचा प्रश्‍न मिटण्यास मोठी मदत होणार आहे. (hope of Otoor project work approval Follow up of MLA Nitin Pawar Nashik News)

ओतूर ल.पा. योजना या धरणाचे काम १९७७ साली पूर्ण झाले आहे. सदर प्रकल्पात प्रथम पाणीसाठा झाल्यापासूनच गळती झाली होती. त्यामुळे २०१२ मध्ये गळती प्रतिबंधक उपाययोजनेतून तत्कालीन माजी मंत्री स्व. ए. टी पवार यांनी ७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळविली.

त्यानंतर २०१३ मध्ये धरणाचे काम सुरु करण्यात आले. तांत्रिक अडचण आणि मालेगाव पाटबंधारे विभागाने अपूर्ण तरतुदी केल्यामुळे २०१४ मध्ये हे काम बंद पडले होते.

यानंतर चार वर्षांनी २०१८ मध्ये हा प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पाकडे हस्तांतरित करण्यात आला. अपूर्ण सर्वेक्षण आणि तरतुदी अतिशय कमी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळ यांच्याकडे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आला.

२०१४ ते २०१८ या कालावधी शासनस्तरावर काही एक कार्यवाही झाली नसल्याने हा प्रकल्प लालफितीत अडकला.

२०१९ साली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला शासनस्तरावर चालना मिळाली. ३१ ऑगस्ट २०१९ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता संदर्भात प्राधिकरणास प्रस्ताव सादर करण्यात आला.

१६ ऑक्टोबर २०१९ रोजी मेरीच्या यंत्रणेने ओतूर प्रकल्पाची पाहणी केली आणि उपाययोजना सुचविल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Otur Minor Irrigation Project
Nashik News: भुसावळ विभागातील पंधरा रेल्वेस्थानकांचा कायापालट! PM मोदींच्या हस्ते रविवारी ऑनलाइन उद्‍घाटन

२ जानेवारी २०२० मध्ये केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र पुणे येथील शास्रज्ञ आणि अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र प्राधिकरण अहमदनगर यांनी ओतूर ल पा प्रकल्पाची गळती प्रतिबंधक उपाययोजनेसाठी पाहणी करून चाचणी करण्याच्या सूचना केल्या.

१८ फेब्रुवारी २०२० रोजी माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दालनात आमदार नितीन पवार यांच्या मागणीनुसार बैठक झाली. यात प्रकल्पाच्या अस्तित्वातील सांडवा, भिंत व अन्य कामासंदर्भात सचिव, मुख्य अभियंता, अन्य अधिकारी व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक झाली.

सिंचनासाठी या प्रकल्पाचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचे आमदार नितीन पवार यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रशासकीय कामाला गती मिळाली.

यातच २०२२ च्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रकल्पातील विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

यानंतर मात्र राज्यात पुन्हा राजकीय अस्थिरता पसरल्याने या प्रकल्पाच्या कामाला ब्रेक लागला होता. मात्र अजित पवार हे पुन्हा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने ‘ओतूर’प्रकल्पाच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

१० मार्च २०२३ रोजी मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रदेश यांच्या दालनात आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाच्या यंत्रणेची बैठक झाली. माती धरणाचे प्राप्त संकल्पनेत बदल व सांडवा संकल्प आदी तांत्रिक विषयावर चर्चा होऊन कामाचा आढावा घेण्यात आला.

"ओतूर प्रकल्पाचे स्व ए टी पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्यामुळे या प्रश्नी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात दोन बैठका झाल्या. २०२२ च्या अर्थसंकल्पात ४ कोटी रुपयाची तरतूद करण्यात यश आले होते. सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा विभागाकडून वित्त व नियोजन विभागाकडे प्रस्ताव गेल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी मिळेल." - नितीन पवार, आमदार

Otur Minor Irrigation Project
Nashik Eyes Infection: मालेगाव शहरात डोळ्यांची साथ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com