dindori agriculture loss
sakal
वणी (नाशिक) - परतीच्या पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेल्या दिंडोरी तालुक्यातील दुष्काळाच्या तीव्रतेचे आता सर्वेक्षण होणार आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने दिंडोरीसह राज्यातील दहा तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीची पडताळणी करून पंचनामे व सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालाच्या आधारे दुष्काळी तालुका जाहीर करण्याबाबत शासन निर्णय घेऊ शकते. तसेच, निकषांनुसार दुष्काळग्रस्तांसाठी लागू असलेल्या शासकीय मदतीच्या योजना व सवलतींचा लाभ मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.