accident death deepak magar, sandip magar and mahesh magar
sakal
सटाणा - माउंट अबू येथील कुलदैवताच्या दर्शनासाठी निघालेल्या अजमेर सौंदाणे (ता. बागलाण) येथील मगर कुटुंबावर राजस्थानमध्ये काळाने घाला घातला. जयपूरपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावरील बगडू टोलनाक्याजवळ शुक्रवारी (ता.२३) मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य सदस्य गंभीर जखमी झाले. धार्मिक दर्शनासाठी एकत्र निघालेल्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे अजमेर सौंदाणे गावावर शोककळा पसरली आहे.