Chetak Festival: चेतक फेस्टिव्हल चमकला नाशिकचा ‘करण’; अश्‍वनृत्य स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक

सारंगखेडा (जि.नंदूरबार) येथे दत्त जयंतीनिमित्त चेतक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये देशभरातून नामांकित अश्‍व दाखल झाले आहे.
Ganesh Warungse, Vicky Warungse, Vaibhav Warungse, Uddhav Shinde, Saurabh Warungse etc. with Chetak Festival winner 'Karan' Ashwa.
Ganesh Warungse, Vicky Warungse, Vaibhav Warungse, Uddhav Shinde, Saurabh Warungse etc. with Chetak Festival winner 'Karan' Ashwa.

Chetak Festival : गणेश वारुंगसे यांच्या ‘करण’ अश्‍वाने भारतातील दुसऱ्या सर्वात मोठा अश्वमेळावा असलेल्या सारंगखेडा (जि.नंदूरबार) येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या अश्‍वनृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावीत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

चेतक फेस्टिव्हलमध्ये यश मिळविणारा करण हा जिल्ह्यातील पहिला अश्‍व ठरला आहे. (horse Karan won third position in horse dance competition nashik news)

सारंगखेडा (जि.नंदूरबार) येथे दत्त जयंतीनिमित्त चेतक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये देशभरातून नामांकित अश्‍व दाखल झाले आहे. फेस्टिव्हलमध्ये अश्‍वांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

यावेळी घेण्यात आलेल्या अश्व नाचकाम स्पर्धेत डुबेरेच्या (ता.सिन्नर) करण या अश्‍वाने देखील आपला सहभाग नोंदवीत उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार राज्यातील २० अश्‍वांनी सहभाग घेतला होता. या सर्वांमधून करण याने तृतीय क्रमांक पटकाविला.

करणच्या या यशामागे मालक गणेश वारुंगसे यांच्यासह विकी वारुंगसे, वैभव वारुंगसे यांच्या मेहनत असून त्यांच्या मेहनतीस यश मिळाले आहे. याकामी सौरभ वारुंगसे, उद्धव शिंदे, तेजस शिंदे, कुणाल गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Ganesh Warungse, Vicky Warungse, Vaibhav Warungse, Uddhav Shinde, Saurabh Warungse etc. with Chetak Festival winner 'Karan' Ashwa.
Chetak Festival: गोल्डन रॉक्स, मॅडोना व तक्षशिला सर्वांत सुंदर अश्‍व; घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धेत चुरस

करणला तयार करण्यासाठी हॉर्स ट्रेनर सलीम पठाण यांचे शिकवण महत्त्वपूर्ण ठरली करण व घोडा मालक गणेश वारुंगसे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून अश्व प्रेमींचे कौतुकाची थाप पडत आहे.

करणच्या यशाबद्दल माजी आमदार राजाभाऊ वाजे, श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्था अध्यक्ष नारायण वाजे, सह्याद्री युवा मंच अध्यक्ष उदय सांगळे, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यासह मान्यवरांनी गणेश वारुंगसे यांचे अभिनंदन केले.

''लहानपणापासूनच ‘करण’ मध्ये एक रुबाबदारपणा व आकर्षक हालचाली दिसून आल्या त्याच्यावर आम्ही काम केले आणि स्पर्धेत उतरवले. सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये करणने उत्तुंग कामगिरी करत विजयश्री मिळवली. हे माझ्यासाठी व महाराष्ट्रातील अश्वप्रेमींसाठी मानाची बाब आहे. माणसाप्रमाणे करणमध्ये असलेला समजूतदारपणा त्यास आमच्या कुटुंबातील सदस्य बनवतो.'' - गणेश वारुंगसे, अश्‍वमालक, डुबेरे

Ganesh Warungse, Vicky Warungse, Vaibhav Warungse, Uddhav Shinde, Saurabh Warungse etc. with Chetak Festival winner 'Karan' Ashwa.
Chetak Festival: सांरगखेड्याचा अश्व महोत्सव देशात आगळावेगळा : गिरीश महाजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com