esakal | कोरोनासारख्या जीवघेण्या संकटावर दोघांची हिमतीने मात! रुग्णालयाकडून सर्व बिल माफ
sakal

बोलून बातमी शोधा

ozar hospital

जीवघेण्या संकटावर हिमतीने मात! रुग्णालयाकडून दोघांचे बिल माफ

sakal_logo
By
उत्तम गोसावी

ओझर (जि.नाशिक) : कोरोना महामारीच्या (corona pandemic) संकटामुळे अवघे जग घाबरून गेले. त्यात काहींनी आपले जीवन समर्पित केले. परंतु काहींनी रडायचे नाही लढायचे, ही उक्ती तंतोतंत अमलात आणून जीवघेण्या संकटावर हिमतीने मात केली. त्यांचे हॉस्पिटलने सर्व बिल माफ करून वैद्यकीय सेवेचे दायित्व दाखवून परिसरात एक आदर्श निर्माण केला आहे.(hospital-Forgive-bill-of-both-who-fight-with-corona-nashik-marathi-news)

ब्याऐंशी वर्षांच्या आजीसह मुलाची कोरोनावर मात

काही दिवसांपूर्वी येथील गरीब सर्वसामान्यांशी नाळ जोडणाऱ्या गफूर शेख यांच्या कुटुंबातील ८२ वर्षांच्या आजी मेहरुमा शेख आणि ६३ वर्षांचा त्यांचा मुलगा जब्बार शेख यांना कोविडची लागण झाली. परिस्थिती आणि या काळातील रुग्णालयांच्या बिलाच्या चर्चा ऐकून ते हतबल झाले. परंतु डॉ. योगेश चौधरी यांना माहिती मिळताच त्यांनी दोघांना त्यांच्या रुग्णालयामध्ये दाखल करून घेतले. डॉ. प्रीती चौधरी, डॉ. योगेश चौधरी या दांपत्याने आपुलकी दाखवून घरच्या माणसासारखी उपचार सुरू केले. व्यवस्थापक डॉ. श्याम देशमुख, डॉ. नीलेश तुपलोंढे, डॉ. फैजल, डॉ. शहा व परिचारिका, सफाई कामगारांनी काळजी घेतली व उपचारांना प्रतिसाद दिल्याने आजीसह मुलानेही कोरोनावर मात केली. रुग्णालयात दाखल केल्यापासून ते सुटीपर्यंत (डिस्चार्ज) सर्व बिल माफ करण्यात आले. डॉ. योगेश चौधरी व डॉ. प्रीती चौधरी यांनी आजीचा व मुलाचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला. गफूर शेख यांनी डॉक्टरांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.

वैद्यकीय सेवेचे दायित्व

ओझर येथील उषा हॉस्पिटलच्या सर्व टीमने व डॉक्टरांनी सर्वतोपरी काळजी घेत आपुलकी, धीर आणि संयमाने ८२ वर्षांच्या आजी मेहरुमा शेख आणि ६३ वर्षांचा त्यांचा मुलगा जब्बार शेख यांना कोरोनामुक्त केले. त्यांचे हॉस्पिटलचे सर्व बिल माफ करून वैद्यकीय सेवेचे दायित्व दाखवून परिसरात एक आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा: ‘ॲम्फोटेरिसिन बी’च्‍या ‘मोफत-विकत’चे गौडबंगाल; ‘एमआरपी’मध्ये विक्री कशी?

या आधीही आम्ही सामाजिक दायित्व म्हणून गरीब कुटुंबांना उपचारासाठी मदत करून अडचणीतील समाजासाठी जबाबदारी म्हणूनच काम केले आहे. या काळात कोणत्याही रुग्णाने घाबरून जाऊ नये. योग्य उपचार, मनोबल, संयम, शिस्त आणि नियमांचे योग्यपालनाची गरज आहे. -डॉ. योगेश चौधरी व डॉ. प्रीती चौधरी, उषा रुग्णालय, ओझर

हेही वाचा: फार्मा कंपनीतील प्रतिनिधीची आत्महत्या; नेमके कारण काय?

loading image
go to top