Crime
sakal
नाशिक: शहर परिसरामध्ये घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वाचार लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. चोरट्यांनी घरफोडीत रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिणे चोरून नेले आहेत. याप्रकरणी गंगापूर व उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पंचवटी हद्दीतील घरफोड्यांची उकल पोलिसांनी केली असून, दुसरीकडे घरफोड्यांचे सत्र मात्र थांबलेले नाही.