नाशिक- कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाशिककडे लागले आहे. त्यात पावसाळ्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांवरून बोंबाबोंब सुरू होत असल्याने उन्हाळ्यातच खड्डे पडलेल्या रस्त्यांची डागडुजी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून केली जात असून त्यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे.