येवला- जिद्द, मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी असली की कुठलाही अडथळा पार करता येतो, हे दाखविले आहे, कासारखेडे येथील शेतकरी पुत्र रूपेश जाधव याने. त्याची मुंबई येथील भारताचे प्रमुख अणुसंशोधन केंद्र येथे वर्ग दोनचा अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या यशाबद्दल जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर यांनी सत्कार केला.