Latest Marathi News | HSC Exam : 12वी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam News

HSC Exam : 12वी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरवात

नाशिक : फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी शनिवार (ता.१) पासून अर्ज भरण्यास सुरवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे दिली आहे. (HSC Exam Application for 12th exam starts from tomorrow Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Nashik : ZP CEO लीना बनसोड यांची बदली

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये बारावीच्या परीक्षेचे शिक्षण मंडळाकडून आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १ ऑक्टोबरपासून कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्क भरण्यासह अर्ज करण्यासाठी मुदत आहे.

व्यवसाय शाखांचे नियमित, पुर्नपरीक्षार्थी, नोंदणी केलेले खासगी विद्यार्थी, आयटीआय घेणारे विद्यार्थी यांना २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरणा करणे व पावती चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करण्याची तारीख मंडळाकडून महाविद्यालयाना कळविण्यात येणार आहे.

हेही वाचा: Nashik : स्त्री वेशात फिरणाऱ्या मनोविकृतामुळे रहिवासी त्रस्त