नाशिक : बारावीचा आज ऑनलाइन निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Result

नाशिक : बारावीचा आज ऑनलाइन निकाल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल (HSC Exam Result) बुधवारी (ता. ८) दुपारी एकला ऑनलाइन (Online) जाहीर करण्यात येईल. (HSC exam results will declare today online Nashik News)

www.maharesult.nic.in, www.hscresult.mkcl.org, https://hsc.mahresult.org.in या संकेतस्थळावर सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणांच्या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन निकालानंतर श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयातील गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिका छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर स्वतः अथवा शाळांकडून अर्ज करण्याची सोय उपलब्ध असेल. गुणपडताळणीसाठी १० ते २० जून पर्यंत आणि छायाप्रतीसाठी १० ते २९ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. ऑनलाइन पद्धतीने त्यासाठीचे शुल्क भरता येईल.

हेही वाचा: MPSC : नाशिकच्‍या उमेदवारांचा डंका

महत्त्वाच्या बाबी
० नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी श्रेणी अथवा गुणसुधार योजनेतंर्गत उपलब्ध
० जुलै-ऑगस्ट २०२२ मधील पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी १० जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील
० बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका शाळा-महाविद्यालयातर्फे १७ जूनला दुपारी तीनला मिळतील

हेही वाचा: नाशिक : UPSC परीक्षेला ४२ टक्‍के परीक्षार्थींची दांडी

Web Title: Hsc Exam Results Will Declare Today Online Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top