Sun, October 1, 2023

HSC Result : एकाच कुटुंबातील सासरे, सून, दीर बारावीत उत्तीर्ण
Published on : 11 June 2022, 12:18 pm
वाडीवऱ्हे (जि. नाशिक) : आव्हाटे (ता. त्र्यंबकेश्वर) येथील एकाच कुटुंबातील सासरे, सून व दीर बारावीची परीक्षा (HSC Exam Result) चांगल्या गुणांनी उत्तीर्ण (Passed) झाले आहेत. (HSC Result success story of dehade family Nashik News)
सासरे लक्ष्मण देहाडे (वय ४८) यांनी खोडाळे केंद्रात परीक्षा दिली ते ६४.५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सूनबाई ऋतिका जाधव (२५) यांनी आव्हाटे केंद्रात परीक्षा दिली. त्या ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालया, तर दीर समीर देहाडे (१९) ६४ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे कुटुंब उदरनिर्वाह करत असून, त्यांना उच्चशिक्षित होण्याचा ध्यास असून, शासकीय सेवेत काम करण्याची इच्छा आहे. त्यांच्या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.