Guru Nanak Dev Jayanti 2022 : श्री गुरुनानक देवजींच्‍या दर्शनासाठी अलोट गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crowd at gurudwara

Guru Nanak Dev Jayanti 2022 : श्री गुरुनानक देवजींच्‍या दर्शनासाठी अलोट गर्दी

नाशिक : श्री गुरुनानक देवजी यांच्‍या जयंतीनिमित्त शहर परिसरातील गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारी (ता. ८) झालेल्‍या धार्मिक कार्यक्रमांसह दर्शनासाठी भाविकांनी गुरुद्वारात गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्‍या होत्‍या. दरम्‍यान, भजन-कीर्तन, सत्‍संग कार्यक्रमात भाविकांनी उत्‍स्‍फूर्त सहभाग नोंदविला. (Huge crowd for darshan of Sri Guru Nanak Dev ji on Guru Nanak Dev Jayanti 2022 Nashik News)

हेही वाचा: Nashik | त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव : लक्ष दिव्यांनी उजळला रामतीर्थ परिसर

श्री गुरुनानक देवजी यांच्‍या जयंतीनिमित्त शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारात गेल्‍या तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. मंगळवारी सकाळी आठपासून कार्यक्रमांना सुरवात झाली. प्रारंभी मनजित सिंग यांचे कीर्तन झाले. यानंतर अखंड पाठ साहब समाप्ती झाली. राजबीर सिंग यांनी सादर केलेल्‍या कीर्तनाचाही भाविकांनी लाभ घेतला व त्‍यानंतर अरदास करण्यात आली. दुपारच्‍या सत्रात ग्रंथी गुरुद्वारा येथील प्रमुख सोहन सिंग यांचे प्रवचन झाले.

मनजित सिंग, राजबीर सिंग यांच्‍या प्रवचनानंतर अरदास करत सत्रातील कार्यक्रमांचा समारोप झाला. सायंकाळच्‍या सत्रात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्‍यानंतर मनजित सिंग, राजबीर सिंग यांचे कीर्तन कार्यक्रम झाले. यादरम्‍यान आयोजित लंगर (महाप्रसाद) चा लाभ आलेल्‍या भाविकांनी घेतला. दुपारच्‍या वेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. जयंती उत्‍सव कार्यक्रमांचे मंगळवारी यशस्‍वी सांगता करण्यात आली.

महिला, चिमुकल्याचा उत्‍साहात सहभाग

धार्मिक कार्यक्रमांमध्ये महिला व लहान मुलांचा विशेष सहभाग राहिला. भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. उत्‍सवानिमित्त सेवा कार्यात सेवकऱ्यांनी सहभागी होत श्रमदान केले. तर काहींनी आर्थिक स्वरूपात मदत दिली.

हेही वाचा: Chandra Grahan 2022 : ग्रहण काळात गोदातीरी रामतीर्थावर भाविकांनी केले स्नान

टॅग्स :NashikHindu religion