ऐन दिवाळीत पडलेल्या अवकाळीने भातपीकाचे प्रचंड नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain crop damaged

ऐन दिवाळीत पडलेल्या अवकाळीने भातपीकाचे प्रचंड नुकसान

अस्वली स्टेशन : इगतपुरीच्या पूर्व भागात काल शुक्रवार ता.६ रोजी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान मेघगर्जनेसह तासभर झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकासह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा: अनिल देशमुखांना जामीन की पुन्हा कोठडी? कोर्टात होणार हजर

सद्या दिवाळी सण असला तरी इगतपुरीत भाताच्या सोंगणीची लगबग सुरु आहे. काही भागात कापणी सुरु आहे तर काही ठिकाणी भात झोडपणी साठी गोळा करुन ठेवले होते अशातच सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान एन दिवाळीत शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवल्याने भात पिकांसह टोमॅटो, वांगे, मिरची, काकडी, फ्लॉवर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

हेही वाचा: नेहरा, धवन आणि पंतला घडवणारे गुरु काळाच्या पडद्याआड

इगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील शेणीत, साकुर, नांदगाव बु,अस्वली, बेलगाव कुऱ्हे,जानोरी, पिंपळगाव डुकरा,भरवीर,धामणगाव, टाकेद आदी भागात भागात भात सोंगणीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांनी भात पिकांची काढणी करुन गोळा केलेले भात पूर्णतः पावसात भिजले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत करावी अशीमागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Huge Damage Rise Crops In Rain Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..