Ladki Bahin Yojana
sakal
नाशिक: मानव विकास कार्यक्रमात २०२५-२६ मध्ये ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य आणि विद्यार्थिनींना शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी ३८ कोटी ९७ लाख ७० हजारांची तरतूद जिल्हा मानव विकास विभागाने केली आहे. विविध आठ योजनांमधून निधी मंजूर करण्यात आला आहे. पण, चालू आर्थिक वर्षाचे सहा महिने संपुष्टात आले असतानाही शासनाने एक रुपयाचा निधी जिल्ह्याला दिलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचा टेंभा मिरविणाऱ्या शासनाने ग्रामीण महिला आणि विद्यार्थिनींना वाऱ्यावर सोडले आहे.