सतत पाठिशी राहणाऱ्या पत्नीची अर्ध्यावर सुटली साथ; पत्नीपाठोपाठ पतीचीही अंत्ययात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

husband-wife death

अवघ्या १७ दिवसांत खेळ संपला! पत्नीनंतर पतीचीही अंत्ययात्रा

सटाणा (जि.नाशिक) : सतत पाठिशी राहणारी पत्नी (wife) अर्ध्यावर साथ सोडून गेल्याने पती पुरते कोसळले. आजाराने पत्नीचे निधन होते. कसेबसे सावरत पत्नी गेल्याचे दु:ख पचवत असतानाच अवघ्या 17 दिवसांतच होत्याचे नव्हते झाले कारण काही कळायच्या आतच त्यांचेही निधन होते…अंगावर शहारे आणणारी ही करुण कहानी आहे सटाणा येथील पवार दांपत्याची... (husband-wife-death-nashik-marathi-news)

सतत पाठिशी राहणाऱ्या पत्नीची अर्ध्यावर सुटली साथ; पत्नीपाठोपाठ पतीचीही अंत्ययात्रा

सटाणा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख, नाशिक येथील मविप्र सेवक सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक प्रा. प्रकाश रामचंद्र पवार (वय ५१) त्यांच्या पत्नी सटाणा महाविद्यालयातील मराठी विषयाच्या प्रा. डॉ. मनीषा प्रकाश पवार-सोनवणे (वय ४९) यांचेही रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ३ मेस निधन झाले होते. अवघ्या १७ दिवसांत पत्नीपाठोपाठ पतीचेही निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे मुलगा आहे. सटाणा येथील माहेरवाशीण असलेल्या (कै.) प्रा. मनीषा पवार कृषी अधिकारी रमेश दौलत सोनवणे यांच्या भगिनी होत्या. दरम्यान, प्रा. पवार यांच्या भावजय आणि भऊर (ता. देवळा) येथील रहिवासी मंगला पवार (वय ५६) यांचेही गुरुवारी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच निधन झाले. भऊर येथील प्रगतिशील शेतकरी धर्मराज पवार यांच्या त्या पत्नी होत.

हेही वाचा: निष्ठावंतांना डावलून पूर्वाश्रमीचे भाजपवासिय समितीत कसे?

उपचार सुरू असतानाच निधन

पत्नीपाठोपाठ प्रा. प्रकाश रामचंद्र पवार यांचे अल्प आजाराने निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर सटाणा आणि नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे गुरुवारी (ता. २०) निधन झाले.

हेही वाचा: ...त्या दिवशी अग्निशामक विभागात खणाणले सुमारे 63 कॉल!

loading image
go to top