ऐकावं तेवढे नवलच! पत्नीच्या छळाला कंटाळून ‘त्याने’ सोडले घर

husband harassed by wife
husband harassed by wifeesakal

जुने नाशिक : पती- पत्नीचे (husband- Wife) नाते आपुलकी, प्रेमाचे (Love) समजले जाते. पुराणांमध्येदेखील या नात्यास अतिशय महत्त्व प्राप्त आहे. सध्याच्या युगातदेखील सात जन्मी हाच पती मिळावा, यासाठी व्रत केला जात असल्याचे उदाहरण आहे. तर, दुसरीकडे सात जन्माची सोबतीच त्रास देते म्हणून पतीला चक्क घर सोडण्याची वेळ येते. असा दुर्मिळ प्रसंग संगमनेर येथे घडला आहे. पतीने छळ केला म्हणून पत्नीने घर सोडले असे अनेक उदाहरण आहे. परंतु, पत्नीने पतीचा छळ केला असे क्वचितच ऐकावयास मिळते. असाच काहीसा प्रकार जुने नाशिक परिसरात समोर आला आहे. (Husband leaves home after wife harassment Nashik news)

संगमनेर येथील अशाच एका कुटुंबात पत्नी पतीचा नेहमी छळ करत असतं त्यांच्याकडून विविध कामे करून घेत. स्वयंपाकदेखील करण्यास सांगत. नित्याचा या त्रासाला कंटाळून शेवटी पतीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. महिन्याभरापूर्वी कोणास काही न सांगता घर सोडले. नाशिक शहर गाठले. जुने नाशिक परिसरातील एका हॉटेलमध्ये महिनाभरापासून त्रस्त पती वास्तव्यास होता. मिळेल ते काम करून स्वतःचा खर्च भागवत होता. संगमनेर येथील पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्ती बेपत्ता असल्याचे नोंद करण्यात आली.

husband harassed by wife
Nashik : चित्रकलाच बनली नवनिर्मितीचे साधन

येथील हवालदार रफिक शेख यांनी तत्परता दाखवत सोशल मीडियावर परिचित व्यक्तींना या व्यक्तीची माहिती आणि छायाचित्र प्रसारित केले. मध्यवर्ती गुन्हे शाखा पथकातील हवालदार शेरू पठाण यांच्या व्हॉट्स ॲपवर संबंधित व्यक्तीची माहिती आली. दरम्यान, श्री. शेख यांनी अत्याधुनिक तांत्रिक प्रणालीचा वापर केला. त्या व्यक्तीचे लोकेशन जुने नाशिक परिसरातील एका हॉटेलमध्ये दाखवत असल्याची माहिती श्री. पठाण यांना दिली. त्यांनी लगेचच बागवानपुरा पोलिस चौकीतील कॉन्स्टेबल रियाज सय्यद यांच्याशी संपर्क साधत माहिती घेतली. दोघांनी जाऊन हॉटेलमधून त्या व्यक्तीस ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, पत्नीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून घर सोडल्याचे त्याने सांगितले. त्याची समजूत काढून त्यास कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पुन्हा एकदा संसार फुलला. पोलिसांच्या तत्परतेचे सर्वांकडून कौतुक करण्यात आले. तिघांनादेखील पती- पत्नीची गैरसमज दूर होऊन त्यांचा संसार पुन्हा फुलल्याचे समाधान झाले.

husband harassed by wife
पशुसेवेला आता महागाईची जखम; पशु वैद्यकीय सेवा शुल्कात 20 पटीने वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com