
इगतपुरी शहर/नाशिक : डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्येप्रकरणी गजआड असलेले संशयित संदीप वाजे तपासात सहकार्य करीत नसल्याची बाब पोलिस विभागाने न्यायालयासमोर मांडली. पुरावे, साथीदार व तांत्रिक विश्लेषणासाठी कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील जयदेव रिके यांनी न्यायालयास केली. पोलिस तपासातील प्रगती अपूर्ण राहिलेल्या बाबी लक्षात घेत न्यायालयाने संशयित संदीप यास सहा दिवसांची पुन्हा पोलिस कोठडी दिली.
शुक्रवार ( ता. ११) रोजी दुपारी तीन वाजता इगतपुरी सत्र न्यायालयात संशयित संदीप वाजे यास तपासी अधिकारी अनिल पवार यांनी हजर केले. न्यायालयात निरीक्षक पवार व सरकारी वकील रिके यांनी तपासाबाबतची माहिती दिली. संशयिताची चौकशी केली असता व पोलिस तपासातील माहितीच्या आधारे मिळून आलेल्या पुराव्याचा तपशील सांगताना घटनास्थळी कारमध्ये मिळून आलेला चाकू. चाकू गाडीत ठेवण्याचा उद्देश काय होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. मयताने केलेली मोबाईल चॅटिंग मोबाईलमधून डिलीट केली असून संशयिताचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे डाटा रिकव्हर करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.
मोबाइलमधील चॅट का डिलीट केली याचे उत्तर संशयित आरोपीला देता आले नाही. संशयिताच्या मोबाईलमध्ये मयतास शिवीगाळ करतांनाचा व्हिडिओ मिळून आला आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. सुवर्णा वाजे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारे शब्द वापरण्यात आले आहेत. आरोपीच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपी दुसरे लग्न करण्यासंदर्भात उल्लेख केलेला आढळुन आला असतांना दुसरे लग्न करण्यासाठी डॉ. वाजे ह्यांचा अडथळा संशयीत आरोपीस असल्याचे निदर्शनास येत असल्याचे संबंधीत घटना क्रम पाहता स्पष्ट होते. तपासातील दिशा लक्षात न्यायालयाने संशयित वाजे यास हा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
डॉ. वाजे प्रकरणात तांत्रिक विश्लेषण हा आता तपासाच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. स्थानिक गुन्हे शाखा व तपासी अधिकारी त्यादृष्टीने कमकाज करीत आहेत. या गुन्ह्यातील साथीदारांना लवकरच गजाआड केले जाईल.
- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.