सिडको- सिडको परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृतपणे वाहने पार्क केल्याने वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, अपघातांची भीती वाढली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शहर वाहतूक पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सिडकोवासीयांकडून करण्यात येत आहे.