Fake Currency Crime : इडलीवाल्याकडे 5 लाखांच्या बनावट नोटा; एकास अटक

Fake Currency news
Fake Currency newsesakal

नाशिक : इडली विकणाऱ्या एका छोट्‌या व्यवसायिकांकडून पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तमिळनाडू येथील रहिवासी असलेल्या संशयित मलायारसन मदसमय ( वय ३३, मूळ रा. ३९,ईस्टमार्ग कायथर, पण्णीकार,कुलूम, तुदूकुडी,तामिळनाडू ) यास पोलीसांनी भारतनगर येथून अटक केली आहे. (idliwala has fake notes of Rs 5 lakhs one Arrested Nashik Latest Crime News)

Fake Currency news
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट सक्रिय; शुक्रवारी NMCच्या प्रश्नावर चर्चा

कालिका यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा चलनात आल्या होत्या. ही बाब मुंबई नाका पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी याप्रकरणी वेगाने तपास करत केला. यात त्यांना मलायारसन मदसमय यांच्याकडे बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचत भारतनगर भागातून संशयित यास अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून पोलीसांनी तब्ब्ल पाच लाख ८ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा मिळून आल्या. यामध्ये त्याच्याकडे ५०० रुपये किमतीच्या ४० बनावट नोटा व दोन हजार रुपये किमतीच्या २४४ बनावट नोटा आहेत. या शिवाय त्याच्याकडून ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम देखील मिळून आली आहे.

Fake Currency news
‘गुणवत्ता’ विभाग NMCचा की ठेकेदारांचा?; बिले मिळवून देण्यासाठी Adjustmentचा फंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com