Latest Marathi News | त्रिगुणात्मक सप्तशृंगगड भागामध्ये बुद्धीदेवता गणेशाच्या 10 ठिकाणी मूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesha idol in ghat on Chandikapur Marg

त्रिगुणात्मक सप्तशृंगगड भागामध्ये बुद्धीदेवता गणेशाच्या 10 ठिकाणी मूर्ती

नाशिक : महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे त्रिगुणात्मक स्वरूप असलेल्या सप्तशृंगगडाच्या भागामध्ये बुद्धी अन् शक्तीचा मिलाप झालेला आहे. बुद्धीदेवता गणेशाच्या दहा ठिकाणी मूर्ती असून, चंडिकापूर मार्गावरील घाटातील गणेशमूर्ती अखंड पाषाणातील आहे. १९६८ पर्यंत नांदुरीगड असा उल्लेख केला जायचा. १९७० मध्ये हा वणीगड म्हणून ओळखला जाऊ लागला, तर १९७८ ते १९८० या कालावधीत वन विभागाने रस्ता केला आणि सप्तशृंगगड, असे म्हटले जाऊ लागले. (Idols of God Ganesha in 10 places in Saptshringi area Nashik Latest Marathi)

श्री सप्तशृंगी निवासिनीदेवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्याशी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने झालेल्या संवादातून बुद्धी-शक्ती मिलापाचे विविध मुद्दे पुढे आले आहेत. गणेशाच्या घाटात तीन आणि ६० पायरी, सिद्धेश्‍वर मंदिर, मारुती मंदिर, दुबेंचे मंदिर, पहिली पायरी या ठिकाणी प्रत्येकी एक, तर पायऱ्यांमध्ये दोन ठिकाणी मूर्ती आहेत.

तसेच मारुतीच्या दत्त चौकात दोन, पायऱ्यांवर दोन, शिवालय तीर्थ भागात एक, अशा पाच ठिकाणी मूर्ती आहेत. याशिवाय दत्त महाराजांची दोन, हेमाडपंती सिद्धेश्‍वर आणि कालेश्‍वर, महिषासुर, माऊलाई, भगवान परशुराम मंदिर आणि दाजिबा महाराजांची समाधी, ही श्रद्धास्थाने आहेत. याशिवाय १०८ कुंडापैकी २६ कुंड उपलब्ध झालेले आहेत. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदायाप्रमाणेच रामायणकालीन संदर्भ ग्रंथांमधून सप्तशृंगगडाच्या अनुषंगाने आढळतात.

हेही वाचा: चुंचाळेत सराईत गुंडांचा धिंगाणा; गुन्हेगाराने केला रहिवाशी महिलेचा विनयभंग

ज्ञानोबा माउलींविषयीचा स्नेहबंध

ज्ञानोबा माउली भावंडांसह सप्तशृंगीदेवीची आज्ञा घेण्यासाठी आल्याचा उल्लेख ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे माउलींविषयीचा स्नेहबंध कायम राखण्याचा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून राबविला जात आहे. आषाढीला माउलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान होण्याअगोदर सप्तशृंगगडावरून भरजरी वस्त्र, मातेच्या मूर्तीच्या चरणावरील कुंकू आणि प्रसाद आळंदीमध्ये दिला जातो.

त्या वेळी वैश्विक कल्याणाची प्रार्थना केली जाते. याशिवाय जानेवारीमधील पौर्णिमेला आळंदीहून त्र्यंबकेश्‍वरला पालखी येते तेव्हा विश्‍वस्त आणि कार्यकारी मंडळाला सप्तशृंगीदेवी मंदिरात आमंत्रित करून मायेचा सन्मान केला जात असल्याची माहिती श्री. दहातोंडे यांनी दिली.

प्रभू रामचंद्र गडावर आल्याचा उल्लेख

प्रभू रामचंद्र यांच्या प्रवासाच्या अनुषंगाने डॉ. श्रीराम अवतार यांनी अभ्यास केला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने प्रभू रामचंद्र यांच्या भ्रमंतीच्या मार्गावरील खणकर्म बंद करण्याचा आदेश दिला. त्यावेळी सादर झालेल्या माहितीमध्ये सप्तशृंगगडावर प्रभू रामचंद्र आल्याचा उल्लेख आढळत असल्याचे श्री. दहातोंडे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: गणरायाचे Thailandचे तिकीट अन् Indonesiaच्या नोटेवर गणपतीची मुद्रा

Web Title: Idols Of God Ganesha In 10 Places In Saptshringi Area Nashik Latest Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..