कोरोनात परीक्षा घेतली नाही तर...पोलिस आयुक्तांना दुचाकीस्वारांचा सवाल

एकत्रित बसवून परीक्षा दिल्याने कोरोनाचा प्रदृभव वाढत आहे
deepak pandey
deepak pandeyesakal

सिडको : नाशिक शहरात(nashik city) रोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित आढळत आहेत, तर दुसरीकडे हेल्मेट न घालणाऱ्या चालकांना एकत्र बसवून परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा पोलिस आयुक्तांनी(police Commissioner deepak pandey) आर्थिक दंड वसूल करावा, अशी अपेक्षा दुचाकीस्वारांनी व्यक्त केली.

deepak pandey
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले! साबण -पावडरच्या किमती ३० टक्क्यांनी महाग

बुधवारी (ता. २०) दुपारी खुटवडनगर पोलिस चौकीत आयुक्त दीपक पांडे यांच्या उपस्थितीत शहर वाहतूक शाखेतर्फे विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडून आर्थिक दंड व एकत्रित लेखी परीक्षा घेण्यात आली. या वेळी पोलिस व दुचाकीस्वारांची चांगलीच गर्दी जमली होती. वाद घालणाऱ्या एका मुलाला पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी अतिशय मवाळ भाषेत हेल्मेट तुमच्या कसे फायद्याचे आहे, याची जाणीव करून दिली. यात तब्बल १३ हजार रुपयांचा दंडही वसूल केला. दुसऱ्यांदा विनाहेल्मेट आढळून आल्यास एक हजार रुपयांचा दंड आणि पुढील तीन महिन्यांसाठी परवाना रद्द करण्यात येणार आहे. यामुळे हेल्मेटसक्तीचा चांगला परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

...अन्‌ पोलिस चौकीत हंशा पिकला

पोलिस आयुक्त दीपक पांडे (deepak pandey)यांचा वाढदिवस असताना, त्यांच्या उपस्थितीत दुचाकीस्वारांवर कारवाई होत होती. त्यामुळे खुटवडनगर पोलिस चौकीत हंशा पिकला होता. ही चौकी कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर जाधव यांनी व्यक्त केली. त्यास पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.(helmet compulsoury)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com