खेडभैरव: मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध इगतपुरी-भंडारदऱ्यात पावसाची गेल्या आठवड्यापासून जोरदार ‘बॅटिंग’ सुरू आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने इगतपुरी-भंडारदरा परिसरातील धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटनपंढरी असणाऱ्या या नगरीत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक अशा मोठ्या शहरांमधून येणाऱ्या पर्यटकांची ‘वीकेंड’ला मांदियाळी पाहायला मिळाली.