सातपूर: महिंद्र, इपिराकनंतर इगतपुरी तालुक्यात ग्रॅफाईट इंडिया कंपनीची इलेक्ट्रॉनिक्स बॅटरी उत्पादनाच्या प्रकल्पासाठी एक हजार ४६१ कोटींची, तर दिंडोरीत व्हिर्च्युसो ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स, कंट्रोलर्स, कंप्रेसर कंपनीची एसी आणि वॉशिंग मशिनसाठी मोटर्सच्या प्रकल्पासाठी ८०० कोटींची गुंतवणूक होत आहे. याविषयीचा करार शुक्रवारी (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. या दोन्ही मोठ्या गुंतवणुकीमुळे दोन हजारांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार आहे.