इगतपुरी पूर्व भागात चार दिवसांपासून वीज खंडित

Power cut
Power cutesakal

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : इगतपुरीत वादळी वाऱ्यासह पावसामुळे विविध ठिकाणी विजेचे खांब पडले आहे. पूर्व भागात गेल्या चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. टाकेद, खेड, पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणी, अडसरे, मायदरा-धानोशी, सोनोशी, बारशिंगवे, वासाळी, इंदोरे, खडकेड, अधरवड, टाकेद खुर्द, अडसरे खुर्द आदी ग्रामपंचायतींसह जवळपास चाळीस वाड्या वस्त्या अंधारात आहेत. (Nashik Rain Update Igatpuri East has been without power for four days)

विजेअभावी सार्वजनिक नळ पाणीपुरवठा बंद असल्याने अनेक कुटुंबांना वणवण करावी लागत आहे. सध्या शालेय प्रवेश प्रक्रिया चालू आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना विविध दाखले कागदपत्रांची गरज आहे, परंतु वीज नसल्याने कोणतेच काम होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग त्रस्त झाले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, परीक्षा चालू आहे. वीज नसल्याने अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चार दिवसांपासून वीज नसल्याने घरघंटी, पीठ गिरणी बंद आहे. यामुळे घरगुती दळण दळण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. अनेकांचे मोबाईल बॅटरी, इन्व्हर्टर संपल्याने पूर्व भागात संपर्क होत नाही. अनेक ठिकाणी पडलेल्या खांबामुळे वीज वितरण कर्मचारी तांत्रिक बिघाड दुरुस्ती करण्यासाठी रात्रीचा दिवस करताना दिसत आहे. अनेकदा स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, पोलिसपाटील वायरमनला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु कोणीही कर्मचारी संपर्कात येत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Power cut
नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न

पूर्व भागात चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा भरण्यासाठी २३ तारीख शेवटची असल्याने चार दिवस विजेअभावी व्यर्थ गेले आहेत. संबंधित विभागाने लक्ष्य घालून लवकर वीजपुरवठा सुरळीत करावा. - दिलीप बांबळे, सीएससी केंद्रचालक, टाकेद बुद्रूक

सध्या ऑनलाइन परीक्षा चालू आहे. अनेक विद्यार्थ्यांचे मोबाईलच चार्ज नसल्यामुळे बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, हे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान आहे. अभ्यासासाठी मेणबत्तीचा वापर करावा लागत आहे" - पूजा पाबळकर, विद्यार्थिनी.

खेड परिसर चार दिवसांपासून अंधारात असल्यामुळे पीठ गिरणी बंद असल्यामुळे घरगुती दळण दळण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित विभागाने तत्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा. - सागर वाजे, ग्रामस्थ, खेड परदेशवाडी.

(Nashik Rain Update Igatpuri East has been without power for four days)

Power cut
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात २४ तासात समाधानकारक वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com