Government Offices
sakal
इगतपुरी शहर: आदिवासी तालुक्यात ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या शासकीय कार्यालयांना ‘अपडाउन’चे जणू ग्रहणच लागल्याचे चित्र सर्वच शासकीय पाहावयास मिळत आहे. कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी राहत नाही, तर काहींनी उशिरा येणे व लवकर कार्यालयातून काढता पाय घेणे, असा प्रकार सुरू आहे. यामुळे नागरिकांना अनेक सेवांपासून वंचित राहावे लागत आहे.