crop
sakal
इगतपुरी: भाताचे आगर आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले. संततधारेसह मुसळधार पावसामुळे भाताला चांगलाच तडाखा बसला असून, पीक पिवळे पडू लागले आहे. ऐन दाणे भरण्याच्या काळात पाऊस अन् धुक्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. संकटांची मालिका सुरूच असल्याने शेतकरी बेचैन आहेत.