Igatpuri tribal area
sakal
इगतपुरी: विकासाच्या गाजावाजामागची विदारक वास्तवता पुन्हा एकदा उघडी पडली आहे. इगतपुरी तालुक्यातील दुर्गम खैरेवाडी येथे केवळ रस्ताच नसल्याने ६५ वर्षीय वृद्धाला आपला प्राण गमवावा लागल्याची लाजिरवाणी व संतापजनक घटना घडली. शुक्रवारी (ता. ९) सकाळी साडेनऊला बबन रावजी शेंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला, तोही डोलीतून, दऱ्याखोऱ्या ओलांडताना!