Municipal Election
sakal
इगतपुरी शहर: इगतपुरी नगर परिषदेच्या माघारीच्या दिवशी शुक्रवारी (ता. २१) दुपारी तीनपर्यंत ७ उमेदवारांनी नाट्यमयरीत्या माघार घेतली. त्यात माजी नगरसेवकांनीसुद्धा ऐनवेळी माघार घेतली आहे. त्यामुळे २१ नगरसेवकपदासाठी आता ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. नगराध्याक्षपदाच्या निवडणुकीसाठी ४ महिला उमेदवारांची लढत होणार आहे. नगरसेवकपदाच्या २१ जागांसाठी ७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, चिन्हाचे वाटप २६ नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बारवकर यांनी दिली.