Municipal Election
sakal
नाशिक
Igatpuri Municipal Election : इगतपुरीत ३० वर्षांच्या सत्तेला सुरुंग! शालिनी खातळे नगराध्यक्षपदी विजयी, इंदुलकरांचा बालेकिल्ला ढासळला
Igatpuri Municipal Election Brings Historic Power Shift : विजयानंतर शालिनी खातळे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. इगतपुरीच्या राजकीय इतिहासात अनेक दशकांनंतर मोठे सत्ता परिवर्तन पाहायला मिळाले असून, मतदारांनी नव्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे.
इगतपुरी शहर: इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या शालिनी खातळे यांनी भाजपच्या उमेदवार मधुमालती मेंद्रे यांचा पराभव केला. निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे १८, भाजपचे २ व उबाठा पक्षाचा १ उमेदवार विजयी झाले.
