Shailputri Ghatandevi
sakal
इगतपुरी: तालुक्याचे ग्रामदैवत थळघाटातील शैलपुत्री घाटनदेवीच्या मंदिरात सोमवारी (ता.२२) घटस्थापना उत्साहात करण्यात आली. पारंपरिक रीतिरिवाजानुसार नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. घटस्थापनेसाठी इगतपुरी शहरासह पंचक्रोशीतील आणि विविध भागांतील भाविकांनी घटी बसविताना शिस्तीचे दर्शन घडविले. तालुक्याच्या विविध भागांतून दाखल भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती.