इगतपुरीत राष्ट्रवादीमध्ये ‘इनकमिंग'; अजित पवारांचा उपस्थितीत प्रवेश

Igatpuri taluka workers join NCP in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar
Igatpuri taluka workers join NCP in the presence of Deputy Chief Minister Ajit PawarSakal

इगतपुरी शहर (नाशिक) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.१४) तालुक्यातील दिग्गज राजकीय पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. मुंबईत हा प्रवेश सोहळा झाला.

या सोहळ्यात गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव, नांदगाव बुद्रुकचे सरपंच देवा मोरे, माजी सभापती राजाराम धोंगडे, विद्यमान लोकनियुक्त सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य परशराम नाठे, कृष्णा सोनवणे, सोसायटीचे चेअरमन विजय बळवंत नाठे, विजय कचरू नाठे, माजी सरपंच रमेश जाधव, कारभारी नाठे, हिरामण नाठे, संतोष आहेर, शांताराम जाधव, संजय अमृता नाठे, नारायण धोंगडे, नामदेव नाठे आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक प्रबळ होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक गावात आपली पकड मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणनीती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे काम तालुक्यात राष्ट्रवादीकडून सुरू आहे. पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, माजी आमदार शिवराम झोले, तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, ज्येष्ठ नेते रतन पाटील जाधव, विष्णू पाटील राव उपस्थित होते.

Igatpuri taluka workers join NCP in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar
नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा धोका? आफ्रिकेतून आलेला संशयित पॉझिटिव्ह

तालुका राष्ट्रवादीमय करणार

दिग्गजांचा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश हा राष्ट्रवादीच्या नव्या रणनीतीचा एक भाग असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. यानंतरही राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच राहणार असल्याचेही नेत्यांनी सांगितले. त्यामुळे ही आगामी निवडणुकांची तयारी असल्याचेही सांगितले जाते. या प्रवेशाने वाडिवऱ्हे जिल्हा परिषद गटासह इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादीचा वरचष्मा वाढला आहे. नुकतेच गोंदे दुमाला ग्रामस्थांच्या बैठकीत त्याचा प्रत्यय आला. या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेशाला मोठे महत्व मानले जात आहे.

Igatpuri taluka workers join NCP in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar
आसामच्या 'मनोहारी गोल्ड' चहाला सोन्याचा भाव! किलोसाठी विक्रमी बोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com