निखिल रोकडे : नाशिक- समृद्धी महामार्गावरील इगतपुरीपासूनचा मुंबईकडील प्रवास आणखी जलद होण्यासाठी इगतपुरी येथे देशातील सर्वांत मोठा व पहिला सुमारे ७.८ किलोमीटरच्या सहापदरी बोगद्याचे काम पूर्ण होत आले असून, येत्या महाराष्ट्रदिनी त्याचे लोकार्पण होत आहे. यामुळे इगतपुरी ते कसाऱ्यादरम्यानचे महामार्गावरील अंतर गाठताना होणारी दमछाक कमी होणार असून, केवळ सात मिनिटांत हे अंतर पार करता येणार आहे, हे विशेष. घोटी ते मुंबई हे अंतर अवघ्या दीड तासात पार करता येणार आहे. त्यामुळे दळणवळणाला नवा आयाम मिळेल.