गोंदे दुमाला: इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य गावचे सुपुत्र मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये जम्मू-काश्मीर येथे सेवारत असलेले विकास मेदडे यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावल्याबद्दल भारतीय सैन्याचा ‘सेना मेडल’ हा शौर्य सन्मान त्यांना जाहीर झाला आहे. त्यांना हा सेना मेडल अवॉर्ड १५ जानेवारीला दिल्ली येथे सन्मानपूर्वक बहाल करण्यात येणार आहे.