Igatpuri News : धम्मगिरी परिसरात आगीचा थरार! इगतपुरी विपश्यना केंद्रात ३ तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
Fire Breaks Out at Vipassana Centre in Igatpuri, No Casualties : इगतपुरी येथील धम्मगिरी विपश्यना केंद्राच्या आवारात कचऱ्याला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने तीन तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण मिळवले.
इगतपुरी शहर: शहरातील जागतिक विपश्यना केंद्राच्या आवारात शुक्रवारी (ता. ६) रात्री लागलेली आग अग्निशमन दलाच्या तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनी आटोक्यात आली. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.