Igatpuri Water Crisis
sakal
इगतपुरी: निसर्गरम्य इगतपुरी शहरात सध्या नागरिकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गटार, नाले आणि शौचालयाचे घाण पाणी मिसळत असल्याने नळावाटे चक्क दूषित पाणी येत आहे. ३८ कोटी रुपये खर्च करूनही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने शहरात वांत्या, जुलाब आणि अतिसारासारख्या साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे.