Igatpuri Development
esakal
नाशिक: गोरेगाव चित्रनगरीच्या धर्तीवर इगतपुरी येथे भव्य चित्रनगरी साकारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या चित्रनगरीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाला जमीन हस्तांतरित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महसूल विभागाला दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे सोमवारी (ता. ६) उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली इगतपुरी चित्रनगरीसंदर्भात बैठक झाली.